बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (19:53 IST)

महाराष्ट्रात मास्कमुक्ती नाही

कोरोना आहे तोपर्यंत मास्क वापरावाच लागणार असं अजित पवारांनी म्हटलं आहे. कोरोना असेपर्यंत मास्क वापरायचाच आहे. या नियमात काही बदल झालेला नाही. महाराष्ट्रात मास्क मुक्ती झालेली नाही. जेव्हा तशी वेळ येईल तेव्हा सांगू. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं अजित पवार यांनी मुंबईत म्हटलं आहे.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विकास कामांची पाहणी केली.   
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विकास कामांची पाहणी केली. मंत्रिमंडळ बैठक झाली की मास्कमुक्ती (Mask) बाबत चर्चा झाल्याच्या बातम्या सुरु होतात. मात्र, जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत मास्क काढून चालणार नाही. मास्क हा लावावा लागणारचं, असं अजित पवार म्हणाले. मास्क मुक्त महाराष्ट्र होणार असेल तेव्हा सांगू. त्यानंतरच बातम्या चालवा, असं अजित पवार यांनी सांगितलं.