बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (21:39 IST)

पारदर्शकता होती, म्हणूनच अजित पवार परत आले

२०१९ वेळी भाजप सत्तेसाठी खुप डिस्परेट होती, त्यामुळे ते कोणालाही हाताशी धरू पाहत होते, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी भाजप त्यावेळी उत्तेजित होती. ज्या अर्थी शरद पवार सांगतात त्या अर्थी हे खरं म्हणावं लागेल, कारण मोदींनी शरद पवारांना सत्ता स्थापनेसाठी आग्रह केला होता, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
 
ते नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. २०१९ च्या सत्तेस्थापनेबद्दल बोलताना म्हणाले कि, भाजप त्यावेळी सत्तास्थापनेसाठी उत्तेजित होती. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, याला फोडा, अजित पवार ला गाठा असे उपक्रम त्यांनी केले. शरद पवारांशी देखील याबाबत बोलणे झाले. मात्र आमच्यात सगळ्या गोष्टीबाबत चर्चा होत असल्याने प्रत्येकवेळी भाजप तोंडघशी पडत होते. कोण कुणाला भेट्तय, कोण कोणाशी बोलतंय हे आम्हाला माहिती होत, त्यामुळे आमच्यात पारदर्शकता होती.. त्यामुळे भाजपचे सरकार स्थापू शकले नाही. अजित पवार गेले, त्यात देखील एक पारदर्शकता होती, असेही ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले कि मनमोहन यांच्या काळात कोणावर ही हेतू पुरस्कर कारवाई झाली नाही, तर लाल बहाद्दूर शास्त्री नंतर इतका निष्कपट पंतप्रधान मी बघितला नाही, आज ज्यांचे घोडे उधळले आहेत, त्यांना एकेकाळी पवार यांनी वाचवलं आहे, राजकारणात संयम महत्वाचा असतो, त्यामुळे राजकारणात मधांद हत्ती प्रमाणे वावरू नये, हत्तीही कोसळतात., असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
 
दरम्यान यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या संचारबंदीविषयी म्हणाले कि, रात्रीची संचारबंदी सुरू आहे, मात्र दिवसा संचारबंदी होऊ नये अशी इच्छा आहे, कारण सकाळी संचारबंदी लागली तर आर्थिक चक्र थांबेल. सुप्रिया, सदानंद सुळे, प्राजक्त तनपुरे, वर्षां गायकवाड यांना देखील कोरोना ची लागण झाली आहे त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात जाताना काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.