मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , मंगळवार, 28 एप्रिल 2020 (14:03 IST)

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही सुवर्णसंधी : गडकरी

कोरोनामुळे जगभरात चीनविरोधात द्वेष वाढत असून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुवर्णसंधी असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामर्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. कोरोनाचा प्रसार केल्याने चीनविरोधात जगभरात द्वेष वाढत असताना भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची आर्थिक संधी असल्याचे गडकरी म्हणाले आहेत. गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून परदेशातील भारतीय  विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

चीनविरोधात द्वेष वाढत आहे. याचे एका संधीत रुपांतरित करणे भारताला शक्य आहे का?, अश विचारणा गडकरी यांनी विद्यार्थ्यांना केली. मला वाटते आपण यावर विचार करणे तसेच लक्ष देणे गरजेचे आहे. आपण भारतात तशी संधी किंवा परिस्थिती निर्माण   करुन दिली पाहिजे. आपण त्यांना मंजुरी तसेच परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी जे काही गरज लागेल ते सर्व देऊ, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.