शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (21:25 IST)

अजित पवार यांनी असे घडविले संस्कृतीचे दर्शन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राहण्यासाठी शासकीय ठिकाणी सोय करावी असे पत्र केंद्र सरकारकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं आहे. या पत्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ कार्यवाही देखील केली आहे. परंतु यासाठी अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील अजित पवारांचा राखीव सूट त्यांना कशाचाही विचार न करता अमित शाह यांना राहण्यासाठी दिला आहे.
 
पुण्यात व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस असून त्यामध्ये दोन सूट आहेत. यामधील दोन्ही सूट हे वर्षाचे बारा महिने राखीव असतात. एक मुख्यमंत्र्यांसाठी असतो तर दुसरा उपमुख्यमंत्र्यांसाठी आहे. पुणे दौरा असला की अजित पवार याच सूटमध्ये आपल्या बैठका आणि कार्यकर्त्यांना भेटत असतात. परंतु अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या राहण्याची सोय शासकीय ठिकाणी करण्यात यावी अशी सूचना देण्यात आली असल्याचे अजित पवार यांना सांगण्यात आले. यावर अजित पवारांनी आपलाच सूट त्यांना देण्यात यावा असे आदेश दिले आहेत.