1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 जुलै 2022 (10:35 IST)

धुळ्यात तीन चिमुकल्यांचा कालव्यात बुडून मृत्यू

Navapada Village at Pimpalner in Sakri Taluka of Dhule
राज्यातील धुळ्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे नवापाडा गावाजवळ कालव्यात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्देवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलांचे वय 10 ते 12 वर्ष आहेत. कालव्यात एकूण सहा मित्र पोहण्यासाठी गेले होते. त्या पैकी तिघे कालव्याच्या पाण्यात बुडून मरण पावले. हुजैफ हुसेन पिंजारी, अयान शफी शहा, नोमान शेख मुख्तार असे मयताची नावे आहेत. हे एकूण सहा जण गावाजवळील कालव्यात पोहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते कालव्यात वाहून गेले.

त्यांना तिघांना पाण्याच्या प्रवाहात वाहताना पाहून इतर मुलांनी आरओरड करत मदत मागितली. घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने मुलांचे मृतदेह कालव्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले पण या पूर्वीच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे चिमुकल्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.