मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:39 IST)

अंबरनाथच्या चिखलोली धरणात दोन मुलं बुडाली

अंबरनाथच्या चिखलोली धरणात दोन लहान मुलं बुडाल्याची घटना घडलीये. या मुलांचा अद्यापही शोध लागू शकलेला नाही. 
सार्थक ओमले आणि महादेव मिस्त्री अशी या दोघांची नावं असून ते अंबरनाथ पूर्वेच्या महालक्ष्मी नगर टेकडी परिसरात वास्तव्याला आहेत. शालेय विद्यार्थी असलेले हे दोघे रविवार असल्यानं चिखलोली धरणात पोहण्यासाठी गेले होते. मात्र तिथे पाण्याचा अंदाज न आल्यानं हे दोघे बुडाले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बोटीच्या आणि हुकच्या साहाय्याने या दोन मुलांचा शोध सुरू केला. मात्र दिवसभर शोध घेऊनही हे दोघे सापडू शकले नाहीत. अखेर अंधार पडल्यानं आजचं शोधकार्य थांबवण्यात आलं असून, पुन्हा शोधकार्य सुरू केलं जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.