बोट पाण्यात उलटली, तिघे बुडाले
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरण परिसरात मासेमारी करत असताना अचानक बोट पाण्यात उलटल्याने तीन मासेमारी करणारे आदिवासी तरुण पाण्यात बुडाले. वेळेवर मदत न मिळाल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. गणेश साबळे, स्वप्निल साबळे आणि पंढरीनाथ मुंढे अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आदिवासी तरुणांची नावे आहेत. माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील केवाडी इथं मासे आणण्यासाठी निमगिरी व राजूर परिसरातील आठ जण होडीने जात होते. प्रमाणापेक्षा जास्त जण असल्यानं आणि भार सहन न झाल्याने होडी पाण्यात उलटली. त्यातील तीन जण पाण्यात बुडाले तर पाच जण पोहून किनाऱ्यावर येण्यात यशस्वी झाले.