गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 एप्रिल 2019 (07:51 IST)

खाणीत बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक शहरालगत असलेल्या आणि ओझर पासून जवळचा असलेल्या सय्यदपिंप्री येथे पाण्यात बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सय्यदपिंप्री येथील ग्रामपंचायतीच्या जागेवर असलेल्या खाणीत घडली असून यामध्ये  नंदू वराडे त्यांची पत्नी सविता वराडे व पुतण्या केशव वराडे असे तिघे जण बुडून दुर्दैवी  मरण पावले आहेत.
 
या खाणीत पंधरा फुटांच्या आसपास पाणी असून, येथे कपडे धुण्यासाठी पतीसह गेलेल्या सविता वराडे या पाण्यात पडल्याने त्यांना वाचवण्यासाठी पती नंदू वराडे हे मदतीला धावले होते मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, तर या  दोघांना बुडताना पाहून  त्यांना वाचवण्यासाठी पुतण्या केशव वराडे यानेही पाण्यात उडी घेतली होती आमत्र यावेळी तिघे दुर्दैवाने खोल पाण्यात बुडाले होते. या सर्वाना जवळपास अडीच तास शोध घेतल्यानंतर गळ टाकून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. याची  उत्तरीय तपासणीसाठी नासिक येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.पुढील तपास नाशिक तालुका पोलीस करत आहे. या घटनेची पोलिसांनी नोंद केली आहे.