गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (17:16 IST)

चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे दोन भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

collapse
सध्या राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. चंद्रपुरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये घराची जुनी भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. 

ही घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या मूळ  तालुक्यात घडली. तर दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यात घडली. 
गेल्या शनिवारी मूळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला सायंकाळी शेतातील काम आटपून  अशोक रघुनाथ मोहुर्ले  घरी आले आणि पत्नीसोबत स्वयंपाकात मदत करू लागले. तेवढ्यात त्यांच्या शेजारच्या घरातील जुनी भिंत कोसळली आणि त्याखाली मोहुर्ले दांपत्याचा मृत्यू झाला.

ही भिंत जीर्ण अवस्थेत होती. त्या घरात राहणारे मोडकीस आलेल्या घराला सोडून दुसरीकडे राहायला गेले.अति पावसामुळे घराची भिंत कोसळून मोंगुर्ले पतिपत्नी त्यात जखमी झाले. उपचाराधीन असता त्यांच्या मृत्यू .या दाम्पत्याला चार मुली असून सर्वांचे लग्न झाले आहे. हे पती-पत्नी एकटेच राहायचे. 

दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यातील रत्नपुरा येथील आहे. येथे राहणारी रसिका मोलमजुरी करायची सकाळी अंगण साफ करताना जवळच्या घरातील जीर्ण भिंत तिच्यावर कोसळली. लोकांनी धावत जाऊन तिला बाहेर काढले ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

मयत रसिका या आपल्या मुलासोबत राहायचा. या अपघाताची माहिती सिंदेवाही पोलिसांत आणि तलाठी कार्यालयाला देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit