रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (09:33 IST)

अवनी वाघिणी : चौकशीसाठी समिती गठित

अवनी वाघिणीला जेरबंद करण्याऐवजी चुकीची पद्धतीने तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.एच.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. वनमंत्री मुनगंटीवार यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.एच.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. बिलाल हबीब, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील. 
 
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्र परिसरात या वाघिणीने 13 जणांचे बळी घेतले होते. याची गंभीर दखल घेत सर्व्वोच्च न्यायालयाने नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यात यावे किंवा ठार मारण्याचे आदेश दिले होते. मात्र वन विभागाने शार्पशूटरकडून चुकीच्या पद्धतीने शिकार करून वाघिणीची हत्या केल्याचा आरोप वन्यप्रेमी संघटनांकडून केला जात आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यासह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तर या प्रकरणी वनमंत्री मुनगंटीवार यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.