1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 मार्च 2019 (13:14 IST)

त्र्यंबकेश्वर मंदिराचे कर्मचारी संपावर

शिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी होत असतांना बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुमारे १२० हून अधिक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे ऐन महाशिवरात्रीच्या काळात त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये कर्मचारी हजर नाहीत. मात्र, या संपामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर समितीकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचं समजतंय. विविध सामाजिक संघटने स्वयंसेवक मंदिरात सेवा बजावत आहेत. यामुळे दर्शनासाठी आलेल्यांची गैरसोय होणार नाही.
 
 ‘समान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे’ ही संपावर गेलेल्या मंदिर कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. याशिवाय कर्मचा-यांना साप्ताहिक सुट्टी मिळावी, महिला कर्मचा-यांना प्रसुती या अशा काही मागण्या करत कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.