शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (08:37 IST)

पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज दोन हजार भाविकांना परवानगी

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला मंदिर समितीने बुधवार पासून दर रोज दोन हजार भाविकांना दर्शनाची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. मात्र दर्शनाला येणार्या भाविकांनी ऑनलाइन दर्शन बुकिंगच करावे लागणार असून इतर आरोग्य विषयक नियमाची अमलबजावणी होणार आहे.
 
 सुरुवातीला जो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळवरून दर्शनाची वेळ आणि तारीख निश्चित करेल अशाच भाविकांना दर्शना सोडण्यात येणार होते. मात्र १००० भाविकांचे ऑनलाइन बुकिंग फुल होत होते. त्यामुळे या बुकिंगची संख्या वाढविण्यात आली आहे. आता दर रोज २ हजार भाविकांना सकाळी ६ ते रात्री ९ या दरम्यान दर्शनाची सोय करण्यात आली आहे. बुधवार पासून याची अमलबजावणी होणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.