शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुण्यात दुचाकी आता सीएनजीवर धावणार

एकेकाळी पुण्याची ओळख सायकलींचे शहर म्हणून होती. मात्र, आजमितीस या शहराची ओळख ‘दुचाकींचे शहर’ म्हणून होऊ लागली आहे. पेट्रोलवर धावणार्‍या दुचाकींसोबत आता सीएनजीवरही दुचाकी धावणार आहे. राज्यातला हा पहिलाच उपक्रम आहे.
देशात वाढत्या प्रदूषणाच्या शहरांमध्ये पुण्याचा तिसरा क्रमांक लागतो. या शहरात ३७ लाख फक्त दुचाकीची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात दुचाकींची गर्दी होऊ लागली आहे. रस्ते अपुरे पडल्याने प्रसंगी शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीसह वायुप्रदूषणाला पुणेकरांना सामोरे जावे लागत आहे. यातून पुणेकरांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र नॅचुरल गॅस आणि आयटुक या कंपनीने दुचाकीवर मोपेड किट बसवले असून यामध्ये एक किलोचे दोन सिंलेडर राहतील.
 
यामध्ये एक किलोमध्ये ६५ किलोमीटर इतके ऍव्हरेज मिळणार आहे. शिवाय याचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही कमी लागतो. यामध्ये गॅस संपल्यास पेट्रोलचाही वापर दुचाकीस्वाराला करता येणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत गॅसचा दरही अर्धा असल्याने नागरिकांचा पेट्रोलवर होणारा खर्चही निम्म्यावर येईल. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राज्यात प्रथम पुण्यात सुरू करण्यात आला. प्रतिसाद वाढल्यानतंर शहरात एमएनजीएलच्या माध्यामतून सेंटर वाढविले जाणार आहेत.