जे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती - उदयनराजे भोसले

udayan raje bhosale
Last Modified शनिवार, 15 जून 2019 (16:51 IST)
नीरेच्या पाण्यावरून रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोघांमधला वाद विकोपाला गेला आहे. रामराजे यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर केलेली टीका चांगलीच जिव्हारी लागली आहे. उदयनराजे भोसले म्हणाले की रामराजे वयाने मोठे आहेत म्हणून मी अजून शांत असून, ते माझ्या वयाचे असते तर जे काही बोलले त्याबद्दल मी त्यांची जीभच हासडली असती असे प्रत्युत्तर भोसले यांनी दिले आहे. बारामतीकडे वळवलेल्या नीरा देवघरच्या पाण्यावरून दोन राजघरण्यांमध्ये जोरदार संघर्ष दिसून येतो आहे. पिसाळलेली कुत्री जोपर्यंत असतील तोपर्यंत मी पिसाळलेलाच राहणार अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी केली, ज्याला उदयनराजे भोसले यांनी उत्तर देत रामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला होता मात्र ते अपयशी ठरले आहेत, कारण त्या बैठकीतून उदयनराजे भोसले बाहेर पडले आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी तीव्र शब्दात त्यांचा आपला
संताप व्यक्त केला आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले की माझी तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी रामराजेंनी केली असून, त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाला हे बोलणं जरा तरी शोभतं का? मी कधीही कोणाचं वाईट चिंतलेलं नाही. तरीही ते म्हणतात मी चक्रम आहे. रामराजेंनी एक लक्षात ठेवावं मी काही बांगड्या भरलेल्या नाहीत. त्यांनी
कुपोषित मुलासारखं वागू नये वेळ पडली तर जशास तसं उत्तर देण्याची आमची तयारी आहे. मात्र आमच्यावर असे संस्कार अजिबात नाहीत. मी काय बोललो ते एकदा सगळ्यांना विचारा. रामराजे जर माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती. त्यामुळे आता हा वाद शमण्याची चिन्हे नाहीत.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

Big Breaking: जगभरातील शेअर बाजारावर कोरोनाचा कहर, ...

Big Breaking: जगभरातील शेअर बाजारावर कोरोनाचा कहर, सेन्सेक्स, निफ्टी, डो जोन्स धडाम
कोरोना विषाणूने आता जागतिक अर्थव्यवस्थेला कहर करायला सुरुवात केली आहे. जगभरातील शेअर ...

ATM मधून आता 1 एप्रिलपासून 2000 च्या नोटा गायब होणार?

ATM मधून आता 1 एप्रिलपासून 2000 च्या नोटा गायब होणार?
इंडियन बँकेने (Indian Bank) आपल्या एटीएम मधून 2000 रुपयांच्या नोटा पुरवणे बंद करून ...

कोरोना विषाणू, राज्यात पाच प्रवासी रुग्णालयात दाखल

कोरोना विषाणू, राज्यात पाच प्रवासी रुग्णालयात दाखल
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात पाच प्रवासी रुग्णालयात दाखल आहेत. 93 जणांना ...

तापमानात झपाट्याने बदल, मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट

तापमानात झपाट्याने बदल, मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट
राज्याच्या तापमानात सध्या झपाट्यानं बदल आहे. किनारपट्टीच्या भागात मुंबईसह कोकणात सध्या ...

वारिस पठाण यांना कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस

वारिस पठाण यांना कलबुर्गी पोलिसांकडून नोटीस
एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांना कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या ...