मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जून 2019 (10:05 IST)

फेसबुकवर दिवसाला तीन लाख रूपये जिंकण्याची संधी

फेसबुकने कॉन्फेटी हा इंटरॅक्टीव्ह गेम भारतात आणला आहे. बुधवार ते रविवार फेसबुकच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर हा खेळ लाईव्ह खेळला जाईल. यात स्पर्धकांना विविध प्रश्न विचारले जातील. त्यातल्या विजेत्यांना ३ लाखांचं बक्षीस जिंकण्याची संधी असेल. 
 
हा शो प्रथम अमेरिकेत प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याचा प्रसार युके, कॅनडा, मेक्सिको, थायलंड, व्हीएटनाम आणि फिलीपाईन्स या देशातही झाला. कॉन्फेटी हा जागतिक स्तरावरचा खेळ असेल मात्र खेळाचा अनुभव हा संपूर्णतः भारतीय असेल असा प्रयत्न फेसबुकने केल्याचं फेसबुक इंडियाने म्हटलं आहे.