Udayanraje Bhosale :मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केले , उदयनराजे भोसले यांचे अशोक चव्हाणवर टीकास्त्र
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे काही केले ते मराठा आडनाव पाटील, शिर्के,भोसले आडनाव लावणाऱ्यानी मराठा समाजासाठी काय केले भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका शुक्रवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना केली. मराठा नसूनही देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिले.
गेल्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली असती तर हा प्रश्न तेव्हाच मिटला असता.पण ज्यांच्याकडे मराठा आरक्षणाची धुरा होती त्यांनी काहीच केले नाही, मी जातपात मानत नाही जातपात करण्यापेक्षा सर्वच जाती मधील आर्थिक दुर्बल घटकांना हे आरक्षण मिळालेच पाहिजे. खरंतर आपल्याकडे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांची व्याख्याचुकीच्या पद्धतीने केली आहे. त्याचा फटका सर्व सामान्य वर्गाला बसत आहे. फक्त मागासवर्गीयांना आरक्षण न देता दुर्बल घटकांना सवलती द्यावा असाही सवाल त्यांनी केला.