शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (07:31 IST)

उद्धव ठाकरे यांना सध्या सुषमा अंधारे यांच्या पदराचा सहारा घ्यावा लागतो

ramdas kadam
उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंची प्रचंड ताकद वाढणार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा, अशी उपरोधिक टीका रामदास कदम यांनी केली.
 
उद्धव ठाकरे यांना सध्या सुषमा अंधारे यांच्या पदराचा सहारा घ्यावा लागतो. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कुणीच राहिलं नाही, त्यामुळे जो येईल त्याला पक्षात घ्यायचं, हा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी सुरू केलाय, अशी टीका रामदास कदम यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत भाष्य करताना रामदास कदम म्हणाले, “प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारे यांच्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड वाढणार आहे. यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कुठे आहे? हे लोकं शोधत बसतील. आता खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांचं पितळ उघडं पडतंय, हे चांगलं आहे. त्यांना खूप शुभेच्छा, अशी उपरोधिक टीका कदम यांनी केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor