सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (17:32 IST)

शिवतीर्थावरआज शपथविधी सोहळा, उद्धव ठाकरे राज्याचे 18 वे मुख्यमंत्री

Uddhav Thackeray's 29th Chief Minister of Maharashtra today
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. २० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे 18 वे मुख्यमंत्री असतील.
 
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुक नेते स्टॅलिन आदी नेत्यांना शिवसेनेने निमंत्रित केले आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता असून, अहमद पटेल व अन्य राष्ट्रीय नेते शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहतील. दीड वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये बिगरभाजप काँग्रेस-जनता दल संयुक्त सरकारच्या शपथविधीसाठी सोनिया यांच्यासह मायावती आणि अन्य राष्ट्रीय नेते उपस्थित होते. याच धर्तीवर शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या या समारंभाला राष्ट्रीय नेत्यांनी उपस्थित राहावे, असे शिवसेनेचे प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे शपथ घेणार आहेत.