बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019 (15:57 IST)

आमच्याकडे बहुमत नसल्याने राज्यपालांकडे देणार राजीनामा - देवेंद्र फडणवीस

सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर अजित पवार हे मला भेटले त्यांनी सांगितले की, मी तुम्हाला सहकार्य करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी हात काढल्यामुळे आम्ही देखील बहुमत सिद्ध करू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद बोलावली असून यामध्ये त्यांनी रजीनामा देण्याबाबत निर्णय घेतला आहे. आमच्याकडे बहुमत नसल्याने राज्यपालांकडे राजीनामा देणार असे देवेंद्र फडणवीस ह्यांनी म्हटले आहे, अर्थातच अवघ्या चार दिवसांत फडणवीस सरकार कोसळले असे स्पष्ट झाले आहे.
 
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले जो पक्ष सरकार स्थापन करत असेल त्यांना आमच्या शुभेच्छा असून आम्ही चांगल्याप्रकारे विरोधीपक्षाची भूमिका पार पाडू.