testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दुष्काळी दौरा करणार केंद्रीय पथक काय लेझिम पथक होतं का बेंजो पथक होतं - उद्धव ठाकरे

Last Modified गुरूवार, 10 जानेवारी 2019 (09:02 IST)
केंद्रीय पथकाने अहवाल दिल्यानंतर राज्यात दुष्काल जाहीर करण्यात आला. मात्र अजूनही दुष्काळाशी लढणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीये. उद्धव ठाकरे याबाबत बोलताना म्हणाले की “केंद्रीय पथक येऊन गेलं एक दीड-महिना झाला तुमच्या हातामध्ये काही पडलं ? हातात आली का मदत ? मग पथकाने केलं काय ? काय लेझिम पथक होतं का बेंजो पथक होतं ? अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुखाद्य तसेच पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. यानंतर बीडमधल्या आशीर्वाद लॉन्स इथल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली.

दैनिक सामानाने याबद्दल सविस्तर वृत्त दिले आहे ते अंशत: देत आहोत. सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना प्रश्न विचारला ‘खरं सांगा की किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे’किती जणांना मिळाला असा प्रश्न विचारला. एकाही शेतकऱ्याचा हात वर होत नाही असं पाहून ते म्हणाले की मी तुम्हाला कर्जमाफीचं सर्टीफिकेट मिळालेला शेतकरी दाखवतो. यावेळी मंचावर अंजनडोह इथल्या बाळासाहेब सोळुंके या शेतकऱ्याला पुढे आणण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी सोळुंके यांना मिळालेला सर्टीफिकेट दाखवलं. उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्यालाच प्रश्न विचारला की सर्टीफिकेट मिळालं पण कर्जमाफी झाली का ? यावर त्या शेतकऱ्याचं उत्तर नाही असं होतं. त्याचं उत्तर संपल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की “या अन्नदात्याला तुम्ही अशा पद्धतीने खोटं बोलून फसवताय ? खोट्या कर्जमाफीचे आकडे आमच्या तोंडावर फेकून तुम्ही आम्हाला सांगताय की कर्जमाफी झालीय म्हणून. का झाली नाही या शेतकऱ्याची कर्जमाफी ? अनेक शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलं. सोळुंके पात्र ठरूनही त्यांची कर्जमाफी होत नाही. हे जर मी चिडून सरकारला जाब विचारला तर तुम्ही मला विचारणार की मी सरकारच्या विरोधात आहे? माझ्या शेतकऱ्याला पिडाल तर मी सरकारच्या विरोधात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही”मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली, मात्र त्याचा खरोखर जनतेला फायदा झाला का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला विचारला. “देश बदल रहा है म्हणता हे तुमच्यासाठी ठीक आहे कारण तुम्ही रोज नवनव्या देशात जात असता त्यामुळे तुम्हाला वाटतं की देश बदल रहा है. तुमच्यासाठी देश बदलतोय मात्र माझ्या देशातील बांधवांची परिस्थिती बदलत नाहीये, त्यांचे राहणीमान, दु:ख, व्यथा,वेदना बदलत नाहीयेत.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल देत आहे 20GB फ्री डेटा, असा ...

national news
टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रतिस्पर्धा वाढत आहे. हेच कारण आहे की कंपन्या रोज रोज नवीन ऑफर वेग ...

मोठा खुलासा: कळसकर, अंदुरेकडूनच दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या

national news
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ...

शाहू महाराज: समाजासाठी झटणारे महान व्यक्तिमत्व

national news
1. छत्रपती शाहू महाराजांच्या कामांमुळे त्यांचे विरोधी भयभीत झाले होते आणि त्यांना जीवावर ...

सरकारच शिक्षण धोरण घातक ..

national news
सध्या राज्य सरकार शिक्षणाविषयी वाटेल ते वाटेल तसे निर्णय घेतय. या निर्णयांनी नवीन पीढीच ...

दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे परेशान टीम इंडियासाठी चांगली बातमी

national news
वर्ल्ड कप 2019 मध्ये खेळाडूंच्या दुखापतीमुळे परेशान टीम इंडियासाठी एक चांगली बातमी आहे. ...