बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 मे 2022 (08:01 IST)

शेततळ्यात बुडून सख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू

river death
संगमनेर तालुक्याच्या घाणेवस्ती येथे शेततळ्यात बुडून सख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार ता. 8 मे रोजी सकाळी घडली आहे. या दुर्दैवी घटनेने मोधळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. जयश्री बबन शिंदे वय (वर्षै 21) व आयुष बबन शिंदे वय (7) असे बहीण-भावाचे नाव आहे.
 
याबाबत समजलेली माहिती अशी की, पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहात आहे. रविवारी सकाळी मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण-भाऊ धुणे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असतांना त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने शेततळ्यात उडी मारली.
 
मात्र दोघेही शेततळ्यातील पाण्यात बुडाले जयश्री व आयुष हे दोघे बहीण-भाऊ शेततळ्यात बुडाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. पण त्या अगोदरच बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.