1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (21:15 IST)

जोपर्यंत चिन्हावर निर्णय होत नाही तोपर्यंत ते आम्हाला द्यावं, गोठवू नये, शरद पवार यांची मागणी

sharad panwar
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यावर  निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू असून राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवलं जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आले. जोपर्यंत चिन्हावर निर्णय होत नाही तोपर्यंत ते आम्हाला द्यावं, गोठवू नये अशी मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
 
शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर झालेली निवड ही बेकायदेशीर असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. शरद पवारांच्या अध्यक्षपदाला मान्यता दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही बेकायदेशीर असल्याचं अजित पवार गटाने सांगितलं. शरद पवार हे आपल्या मर्जीप्रमाणे पक्षाचा कारभार करतात असा आरोपही अजित पवार गटाने केला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाची लढाई निव़डणूक आयोगात सुरू असून दोन्ही बाजूंनी आज जोरदार युक्तीवाद करण्यात आला. या सुनावणीच्या वेळी स्वतः शरद पवारांनी उपस्थिती लावली.
 
आजच्या सुनावणीवेळी शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी  तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह  यांनी युक्तिवाद केला. 

Edited By - Ratnadeep Ranshoor