अवकाळी पावसाचा सांगली जिल्ह्याला तडाखा, 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान
सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळं पिकांना 50 टक्क्यांपेक्षा अधिक फटका बसला आहे. या पावसामुळं जिल्ह्यात जवळपास 11 हजारांपेक्षा जास्त हेक्टर भागातील पिकांची नासाडी झाली आहे.
जवळपास चार दिवस सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात ज्वारी, हरभरा आणि भाजीपाल्यासह प्रामुख्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
फक्त द्राक्षबागांचं नुकसानचं 90 टक्के असल्याची माहिती मिळाली आहे. पावसामुळं अंदाजे 13 ते 15 हजार कोटींचं नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या नुकसानीनंतर कृषी विभागानं पाहणी करत प्राथमिक माहिती घेतली आहे. तर शेतकऱ्यांनी मात्र, लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी केली आहे.