शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2020 (18:01 IST)

आमदार विजय वडेट्टीवार नाराज, विशेष अधिवेशनाला राहिले गैरहजर

महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये काही प्रमाणात मंत्रिपद  मिळाली नसल्यामुळे नाराजी असल्याचं दिसून आलेलं आहे. आता मंत्रिपद मिळालं असून देखील ते आवडीचं न मिळाल्यामुळे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार नाराज असल्याचं उघड झालं आहे. या नाराजीमुळेच ते अनुसूचित जाती-जमातीसाठी असलेल्या आरक्षणाला मुदतवाढ देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाला गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसकडून गेल्या दोन दिवसांपासून वडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊन देखील त्यात अपयश आल्याचंच आजच्या वडेट्टीवार यांच्या अनुपस्थितीवरून दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
 
विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली आहेत. मात्र, मिळालेल्या खात्यावर वडेट्टीवार नाराज वृत्त आहे. मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीला देखील वडेट्टीवार यांनी दांडी मारली होती.