Widgets Magazine
Widgets Magazine

इतिहासाच्या पुस्तकातील उल्लेख तपासून पाहण्याचे आदेश देणार - विनोद तावडे

मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (17:19 IST)

राज्य माध्यमिक मंडळाच्या नववीच्या इतिहासाच्या पुस्तकातील माजी प्रधानमंत्री राजीव गांधी तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांच्याविषयी प्रकाशित झालेला मजकूर तसेच त्यातील विशिष्ट उल्लेखांची आवश्यकता तपासून पाहावी यासाठी अभ्यास मंडळाला आदेश देण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. तावडे पुढे म्हणाले, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये केवळ स्वातंत्र्यपूर्व घडामोडींचाच नव्हे तर नवीन इतिहासाचाही समावेश असावा. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यानंतरच्या नेत्यांची ओळख व्हावी यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यात आले. यात कोणताही राजकीय उद्देश नव्हता. हे बदल करण्यासाठी  इतिहासाचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने सन 2000 पर्यंतच्या इतिहासाचा समावेश पाठ्यपुस्तकात केला. अनेक उल्लेखनीय व महत्त्वाच्या घटनांचा चांगला उल्लेख या पुस्तकात आला आहे. मात्र राजीव गांधी यांच्या संदर्भात आलेला बोफोर्स तोफ खरेदीचा विषय आणि इंदिरा गांधी यांचा आणीबाणीच्या काळातील संदर्भ अनावश्यक असल्याची भावना सभागृहाची झाली असल्याने तसे अभ्यास मंडळाला कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

बूथ व मंडल यंत्रणा अधिक सक्षम करा! ‍ - सौंदान सिंह

भाजपाची बूथ आणि मंडलस्तरावरील यंत्रणा अधिक सक्रिय आणि सक्षम करा. पक्षाचे संघटन मजबूत ...

news

ब्ल्यू व्हेल गेममुळे मुंबईत पहिला बळी

मोबाईल किंवा व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेलेला वर्ग मोठा आहे. या गेम्सचे इतके व्यसन तरूणाईला ...

news

जुळ्यांची ग्रोथ बघण्यासाठी 10 हजार वेळा स्कॅन

लंडन- भारतीय वंशाच्या महिलेने प्रथमच गर्भात सतत निगराणी करण्यात आलेल्या जुळ्या मुलांना ...

news

ट्रम्प यांच्यासोबत सेल्फी काढल्याने महिलेचा घटस्फोट

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकदा चर्चेत ...

Widgets Magazine