बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (09:29 IST)

विश्वास नांगरे पाटील अडचणीत : नांगरे पाटील यांच्या सासऱ्यां विरोधात ईडीची कारवाई

औरंगाबाद येथे मोठ्या व्यावसायिकांच्या घरात ईडीने छापा मारून कारवाई केली. त्या उद्योजकांमध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे पद्माकर मुळे यांचाही समावेश आहे.  वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबई, पुणे आणि औरंगाबादसह ईडीने सात ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने उद्योजक पद्माकर मुळेंच्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. औरंगाबादातील अनेक बडे उद्योजक आणि बिल्डरांच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे.
 
पद्माकर मुळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध आहेत. पद्माकर मुळे यांची औरंगाबाद मध्ये अजित सीड्स नांवाने कंपनी आहे. ते छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे विश्वस्त असून त्यांच्या नावी साखर कारखाना देखील आहे.