1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (08:39 IST)

तीन दिवस विठ्ठल दर्शन बंद

Vitthal Darshan
कार्तिकी एकादशी सोहळा दरम्यान पंढरीत गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी २५ ते २७ नोव्हेंबर या तीन दिवशी विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी आवश्यक असणारे ऑनलाईन पास देखील बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने घेतला असल्याची माहिती सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
 
शासन आदेशानुसार १६ नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर खुले करण्यात आले आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी दर्शन पासची ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आली आहे. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २५ व २६ नोव्हेंबर रोजी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.