शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2019 (08:09 IST)

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा टाळेबंद जाहीर

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला २०१८-१९ या अर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यापर्यंत २६ कोटी १६ लाख ७० हजार २२७ रुपये उत्पन्न मिळाले आहे. १२ कोटी ५८ लाख ९१ हजार ५४० रुपये खर्च झाला आहे. शिर्डीच्या साईबाबा, तिरुपतीचे बालाजी मंदिर यांच्या तुलनेने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला कमी उत्पन्न मिळते. मिळालेल्या उत्पन्नातून अर्ध्यापेक्षा जास्त खर्च होत आहे. यामुळे इतर देवस्थानच्या तुलनेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे उत्पन्न देखील शिल्लक राहत नाही.
 
श्री विठ्ठल-रुक्मिणीला दान, देणगी, भक्तनिवास, पालखी सोहळा, थेट प्रक्षेपण, महावस्त्र, विविध पूजा, लाडू विक्री यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. कर्मचाऱ्यांचे वेतन, विद्युत बिल, अन्नछत्र, गो शाळा, बिल्डिंग दुरुस्ती व अन्य कारणासाठी मंदिर समितीचा खर्च होतो.