बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 ऑक्टोबर 2025 (11:02 IST)

राज्यातील नगर परिषद व नगर पंचायती निवडणुकांसाठी 8 ऑक्टोबर रोजी मतदार यादी जाहीर होणार

Maharashtra Election 274
राज्यातील 274 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया वेग घेऊ लागली आहे. यामध्ये 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असून त्यासाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, या प्रारूप याद्यांवर 13 ऑक्टोबर 2025पर्यंत नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून 28 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार असून निवडणूक आयोगाने सांगितले की,1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करण्यात आला आहे.
त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादीच या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये विधानसभा मतदार यादीतील नावे व पत्ते कायम ठेवले जाणार या याद्यांमध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे अथवा पत्ता दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नाही.
प्रभागनिहाय यादी तयार करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, चुकून मतदाराचा प्रभाग बदलणे, विधानसभा यादीत नाव असूनही प्रभागनिहाय यादीत नाव नसणे अशा त्रुटींवर मतदार हरकती व सूचना नोंदवू शकता.
 
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांची अचूक नोंदणी होण्यासाठी नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या वेळेत दाखल करण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
 
Edited By - Priya Dixit