शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , गुरूवार, 18 मार्च 2021 (07:13 IST)

विदर्भात ऑरेंज अलर्टचा इशारा

गेल्या दोन दिवसापासून हवामानामध्ये थोडा फरक पडला असून कधी आभाळ तर कधी ऊन असे वातावरण बघायला मिळत होते. हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. येत्या चार दिवसात नागपूरसह विदर्भात पावसाच्या सरी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूरसह वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने  वर्तविली असून वादळाचा वेग ३० ते ४० किलोमीटरचा राहील असे सांगण्यात आले आहे.
 
18 ते 20 मार्च या तीन दिवसात विदर्भात पावसाची शक्यता असून नागपूर, वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. १९ मार्चला मेघगर्जनेसह वादळी पाऊस  होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.