शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2016 (10:13 IST)

नवी मुंबई आयुक्तांचे मोठे निर्णय

नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज 3  निर्णय घेतले. ते तीनही निर्णय फार मोठे आहेत. यामध्ये नवी मुंबईतील 43 हजार झोपडीधारकांना 16 कागदपत्रांऐवजी फक्त आधारकार्ड आणि झोपडपट्टी सर्वेक्षणावर वैयक्तिक नळ जोडणी देण्यात येणार आहे.

दुसरीकडे शहरातील ओसी नसलेल्या 10 हजार इमारतींना ओसी नसल्याने टँकरचे पाणी प्यावे लागत होते. या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना शुध्द पाणी मिळावं यासाठी आता यापुढे या सर्व इमारतींना कमर्शिअल दराने महापालिका पाणी पुरवठा करणार आहे.