Widgets Magazine

लातूर पाणी प्रश्न सोडवणे गरजेचे

रेल्वेने पाणी आणावे लागले हा कलंक असून तो पुसायचा आहे. लातूरला पाणी प्रश्न मिटवायचा आहे असे
असे नवे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत सांगतात. श्रीकांत यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्विकारला. कालच लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभारही त्यांनी स्विकारला.

लातुरकरांना रेल्वेने पाणी पुरवले गेले हे कर्ज आहे, त्याचा बोजा आहे असे जिल्हाधिकार्‍यांना वाटते. लातुरात पाण्याची समस्या आहे. ती मार्गी लावायची आहे. यासोबतच कचरा नियोजनाचाही प्रशन आहे. तोही मार्गी लावायचा आहे असं ते सांगतात.लातूरचा पाणी प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न आहे.


यावर अधिक वाचा :