बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (20:46 IST)

वाझे यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळले

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाबाबत मला काहीच माहीत नाही. आता खबर मिळाल्यानंतर मी तिकडेच जायला निघालो आहे, असा दावा एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी केला आहे. यावेळी वाझे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळून लावले. 
 
उद्योगपती मुकेश अंबानी  यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीमालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे हे प्रत्येक यांच्यावर या प्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यावर सचिन वाझे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मनसुख हिरेनचं काय झालं मला काहीच माहीत नाही. मला आताच कळलंय. मी ठाण्यालाच चाललो आहे, असं वाझे म्हणाले.