गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (15:46 IST)

आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका’ लोणकर कुटुंबीयांना दिला मुख्यमंत्री यांनी धीर

We are with you
‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत..काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला.

स्वप्नील लोणकर यांचे आई,वडीलआणि बहिण यांनी मुख्यमंत्री  ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली.त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वप्नीलचे आई,वडीलांचे सांत्वनही केले.तसेच स्वप्नीलच्या बहिणीला करता येईल,ती सर्व मदत केली जाईल,असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वनीलच्या आई सौ. छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्देवी आहे.पण धीराने घ्यावे लागेल.आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत.काळजी करू नका,असा धीर दिला.