सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (07:55 IST)

आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला : संजय राऊत

uddhav sanjay
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. या  राजीनाम्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी “आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे”, असे म्हटले आहे. ट्विट करत संजय राऊत यांनी आपली भुमिका मांडली.
 
“मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ!”, असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.