शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (21:23 IST)

परब यांच्या रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय आपण सुस्त बसणार नाही : सोमय्या

ठाकरे सरकार काळातील भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेलय अनिल परब यांच्या दापोली येथील ट्विन रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय आपण सुस्त बसणार नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केले. भाजपचे शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या धामणकर नाका मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती उभारली असून या देखाव्याचे उदघाटन किरीट सोमय्या व आरसी पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी सोमय्या बोलत होते.