शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :हिंगोली , शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (15:57 IST)

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट

प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील चार दिवसांत मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज वर्तविला आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीला राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  
 
कमाल तापमान हळू हळू वाढेल. सात आणि आठ मार्च रोजी आकाश ढगाळ राहील. आठ मार्च रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे; असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला आहे.
 
शेतकऱ्यांनी काढणीस तयार असलेले पिकांची काढणी करून घ्यावी. पिक सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे. शेतकऱ्यांनी गाय, बैल, म्हैस, रेडा हे पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे; अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. मराठवाड्यात ९ ते १५ मार्चपर्यंत कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.