मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राज्य सरकारची वेबसाईट बंद

राज्य सरकारची www.maharashtra.gov.in ही वेबसाईट सकाळपासून बंद पडली आहे. यामुळे विविध शासकीय योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी करणे, अर्ज करणाऱ्याचा गोंधळ उडाला आहे. राज्य सरकारच्या जवळपास ३९ विभागांच्या कारभाराची माहिती सातत्याने www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर अपलोड करण्यात येते. या संकेतस्थळामध्येच राज्य सरकारच्या इतर विभागाच्या वेबसाईटची लिंक जोडण्यात आलेले आहेत. 
 
या वेबसाईटला रोज असंख्य नागरिक विविध योजना आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या अर्जासाठी भेट देत असतात. ही वेबसाईटच शुक्रवार सकाळपासून बंद पडल्याने गोंधळ उडाला आहे. आठवड्याभरात तिसऱ्यांदा राज्य  शासनाची वेबसाईटव क्रॅश झाल्याने डिजीटल कारभार कसा चालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे मॅग्नेटिक महाराष्ट्रसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करून विविध क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यात येत असताना जर सरकारचे संकेतस्थळच वारंवार बंद पडणार असेल तर केवळ माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच भवितव्य काय असा प्रश्न उपस्‍थित होत आहे.