गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जुलै 2022 (07:58 IST)

मुंबईच्या भाजप कार्यालयात लग्न सोहळा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक ट्विट

prithviraj chauhan
एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज भाजपच्या मुंबई कार्यालयात सुधीर मुनगंटीवार, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर आणि मंगलप्रभात लोढा या भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन केले. पण या सेलिब्रेशनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते अनुपस्थित होते. त्यावरुन काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक ट्विट करून ‘मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब’ असे म्हणत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
 
फडणवीस यांनी काल एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करताना आपण सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं म्हटलं होतं. पण केंद्रीय नेतृत्त्वाच्या आदेशानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. ठाकरे सरकार उलथवून टाकण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका होती. तरीही त्यांना मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते नाराज होते. ती नाराजी शपथविधीवेळीही स्पष्ट दिसत होती.