मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: लातूर , शुक्रवार, 17 मे 2019 (16:57 IST)

एटीएस ने मराठवाड्यात पकडलेल्या चार काश्मिरी तरुणांनाचे पुढे काय झाले

जिल्ह्यातील अहमदपूर आणि उदगीर या शहरातून संशयास्पदरित्या फिरत असल्याने लातूरच्या दहशतवादविरोधी पथकाने तात्काळ यंत्रणा राबवून जम्मू-काश्मिरच्या चार तरुणांना अटक केली होती. त्यांची ३० तास कसून चौकशीही करण्यात आली चौकशीअंती हे चारही तरुण जम्मू-काश्मिरच्या पूंछ जिल्ह्यातून वर्गणी गोळा करण्यासाठी लातूर जिल्ह्यात दाखल झाल्याचं समोर आलं आहे. या तरुणांनी जम्मू-काश्मिर ते नांदेड आणि नांदेड ते अहमदपूर असा प्रवास करत एक तरुण उदगीर तर तीन तरुण अह्मदपूर शहरात दखल झाले होते. त्यांचे आधारकार्ड, फोटो जप्त करण्यात आले असून त्यांच्या मोबाईल सीडीआर अर्थात कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्याचे काम सुरु आहे. तसेच अन्य कागदपत्रेही तपासण्यात आली आहेत. यासोबतच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. चौकशी केल्यानंतर त्यांची रवानगी काश्मिर राज्यात करण्यात आली असून यासंदर्भात लातूर पोलीस काश्मिर येथील पोलीस यंत्रणाच्या संपर्कात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव यांनी दिली आहे. या तरुणात शबीर अहमद, अब्दुल रजाक, सलील अहमद, इम्तियाज अहमद यांचा समावेश आहे.