शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (15:05 IST)

मी संजय राऊतांचे काय हाल करेन : संजय गायकवाड

sanjay gaikwad
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत संजय गायकवाड यांनी धमकीवजा इशारा दिला आहे. संजय राऊत यांचं आता थोबाड फोडायची वेळ आली आहे, असं संजय गायकवाड म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होता.
 
नेमकं प्रकरण काय?
खरं तर, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी नुकताच पुणे दौरा केला. या दौऱ्यात अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले, अशा शब्दांत अमित शाह यांनी टीका केली.
अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाची चाटत आहेत. अशी चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती, अशी टीका संजय राऊत यांनी केली. राऊतांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे