बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (21:33 IST)

मी ज्यावेळी मुलाखत देईल तेव्हा भूकंप होईल; --मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला इशारा

eknath shinde
धर्मवीर आनंद दिघे यांचा आम्ही केवळ चित्रपट काढत काम काय केले हे दाखवले आहे. पण, धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर भाष्य करणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथे जाहीर सभेत केले. यावेळी ते म्हणाले की, मी ज्यावेळी मुलाखत देईल तेव्हा भूकंप होईल. अन्याय विरोधात पेटून उठा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. मी आज काही बोलणार नाही. मात्र, समोरून जसे जसे तोंड उघडेल मग मलाही बोलावे लागेल असे सांगत त्यांनी इशाराही दिला. या सभेत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाही केली.
 
या सभेत बोलतांना ते म्हणाले की, आम्ही हिंदुत्वाची भूमिका घेऊन भाजप सोबत गेलो, अडीच वर्षात हजारो लोकांवर गुन्हे दाखल झाले. शिवसेनेच्या सरकार मध्ये शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले हे मान्य आहे का ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. शिवसेनेच्या आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले आम्ही अनेक वेळा प्रयत्न केले पण आम्हाला दुर्दैवाने यश आले नाही. या सभेत त्यांनी आम्ही आमच्या कुटुंबाला वेळ दिला नाही. रात्र-दिवस शिवसेनेसाठी काम केले. या मेहनतीमधून शिवसेना मोठी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री झाले. मग हा विश्वासघात, गद्दारी कोणी आम्ही केली तुम्ही केली असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्यानंतर त्यांनी धर्मवीर सिनेमा काही लोकांना रुचला नाही. पचला नाही, मी आज जाहीरपणे बोलणार नाही. आज ज्या मुलाखतीचा सपाटा चालू आहे त्यावरही मी बोलणार नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यावेळी भूकंप होईल असा इशारा त्यांनी दिला.