मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (18:55 IST)

राज्यात कुठे पडणार मुसळधार पाऊस?

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यात पुढील २४ तासांत मुंबईसह, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. तर पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही तासं या जिल्ह्यांसाठी पावसाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहेत. 
 
नाशिकमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. तर मुंबईतही दिवसभर पावसाची संततधार सुरु आहे. शिवाय पालघर, डहाणू, रायगड, रत्नागगिरीतही मुसळधार पावसाने कहर केला आहे. तर पुढील २४ तासांत मुंबईसह, नाशिक, रायगड, रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 
 
राज्यात कुठे पडणार मुसळधार पाऊस? मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकणात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय नाशिमध्येही पावसाच्या दृष्टीने पुढील २४ तास महत्त्वाचे आहेत. तर पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय उर्वरित महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरु राहणार आहे. मात्र रविवारपासून पुढील ४ दिवस राज्यासाठी पावसाचा इशारा नाही.