बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 डिसेंबर 2022 (07:51 IST)

भिडे गुरुजी आता अमृता वहिनींना जाब विचारतील का?

sushma andhare
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद यांसह अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. यातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळख असलेल्या सुषमा अंधारे ( यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या पत्नी अमृता फडणवीस  यांच्या एका विधानाचा आधार घेत, भिडे गुरुजी  आता अमृता वहिनींना जाब विचारतील का, असा सवाल सुषमा अंधारेंनी केला आहे.
 
मुंबईतील पत्रकार महिलेला टिकली लावली नाही म्हणून मी प्रतिक्रिया देणार नाही, असे भिडे गुरुजी म्हणाले होते. त्यानंतर अलीकडेच अमृता फडणवीस यांनी मंगळसूत्र घातल्यावर मला गळा आवळल्यासारखे होते, असे विधान केले होते. यावरून, संस्कृती जपणारे भिडे गुरुजी आता अमृता वहिनींनाही जाब विचारतील का? टिकलीवरुन महिला पत्रकाराला बोलणारे भिडे गुरुजी अमृता वहिनीच्या मंगळसुत्रावरील वक्तव्यावर बोलतील का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
Edited by : Ratnadeep Ranshoor