रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (10:48 IST)

महाविकास आघाडीत असलो, तरी गप्प बसणार नाही - राजू शेट्टी

महाविकास आघाडीत आम्ही सहभागी असलो, तरी गप्प बसू असं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कदापी मागे हटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. सोलापुरात स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली.
 
एकापाठोपाठ एक नैसर्गिक आपत्तीमुळं राज्यातील शेतकरी खचला असून, त्याला तातडीनं दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळं दिलेल्या आश्वासनाप्रमाणं शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिलमाफीचा निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी राजू शेट्टींनी केलीय.
 
या बैठकीत राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण राज्य कार्यकारिणी बरखास्त केली. पुढच्या महिन्यात जिल्हा आणि राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी होतील, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. नव्या कार्यकारिणीत तरुणांना संधी देणार असल्याचंही शेट्टी म्हणाले.