मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (15:41 IST)

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार का? उद्धव ठाकरे म्हणाले…

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं  राज्यातून काढता पाय घेतला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका तज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. यावरुन सर्वत्र चर्चा आहे. पंरतु, या पार्श्वभुमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित ‘राज्याचा अर्थसंकल्प माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात’ या दोन दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ पार पाडला. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट ओसरलीय असं म्हटलं जातंय, तसा थोडा अनुभवही येतोय. तिसरी लाट येऊ नये ही प्रार्थना आहेच, पण त्याला प्रयत्नांची साथ हवी आहे. पण तिसरी लाट आलीच तर काय करायचं? त्यासाठी आज उभ्या करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची काळजी घेण्याची गरज आहे. त्या सुविधा योग्य प्रकारे चालू राहतील हे पाहणं महत्त्वाचं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आजवर शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्राकडं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं.कोरोनाची साथ आणि नैसर्गिक संकट आल्यानंतर सर्वांची दाणादाण उडाली.अशा स्थितीतही जगात कुठेही नसतील इतक्या वेगानं नि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या.लोकांचे जीव वाचवण्यास आपलं प्राधान्य असल्यामुळं मागील 2 वर्षात आरोग्य क्षेत्राला अधिक निधी दिला.