सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (14:44 IST)

अकोला रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली, RFP च्या जवानाने वाचवले प्राण

रेल्वे प्रशासनाकडून नेहमी सांगण्यात येत की  धावत्या रेल्वेत प्रवाशांनी चढू किंवा उतरवू नये. तरीही काही लोक आपल्या जीवाची पर्वा न करता धावत्या रेल्वेतून चढ -उतार करतात. 
अकोला रेल्वे स्थानकावर काचीगुडा एक्सप्रेस ने जात असताना महिलेचा तोल गेला आणि ती धावत्या रेल्वे खाली पडली. ती पडलेली पाहून रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यानी पाहिल्यावरप्रसंगावधान राखून ते तातडीने धावत आले आणि तिचे प्राण वाचविले.  सदर घटना अकोला रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय बैसाणे यांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. 
बी आर धुर्वे असे या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते अगदी देवदूता सारखे धावत आले आणि महिलेचे प्राण वाचविले. त्यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.