शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (11:42 IST)

व्हाट्सअँप स्टेटस वरून दोन गटात हाणामारीत महिलेच्या मृत्यू

मुलीने व्हाट्सअँप स्टेटस ठेवल्याचा राग मनात धरून पालघरात दोन गटात झालेल्या हाणामारीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बोईसर येथील शिवाजी नगर येथे घडली आहे. 
व्हाट्सअँप स्टेटस ठेवल्याचा राग धरून  एका 46 वर्षीय महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ती महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती उपचाराधीन असता तिचा मृत्यू झाला. लीलावती देवीप्रसाद असे या मयत महिलेचे नाव आहे.