सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2023 (17:07 IST)

पोलिसानेच केला तरुणीवर बलात्कार

rape
ज्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा असते, त्यानेच अन्यायाची परिसीमा गाठली. हा धक्कादायक प्रकार हिंगणघाट पोलीस ठाण्यात घडला आहे. चोवीस वर्षीय युवती एक तक्रार करण्यासाठी ठाण्यात गेली असता तिच्यावर वारंवार अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे.
 
तरुणीने तक्रारीत नमूद केल्यानुसार ती 5 ऑगस्ट 2021 ला हिंगणघाट ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली होती तेव्हा त्यावेळी सेवेत असणाऱ्या ठाणेदार चव्हाण यांनी तरुणीला मैत्री केल्यास प्रकरण मार्गी लावतो असे म्हणत ओळख वाढविली. नंतर युवती घरी एकटी असताना संधी साधून तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित केले आणि व्हिडिओ पण तयार केले. सतत ब्लॅकमेल करत युवतीवर वारंवार अत्याचार केल्याची तक्रार केली गेली आहे.
 
शेवटी या प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीने आरोपीच्या पत्नीस सर्व कथन केले. मात्र पत्नीने देखील आरोपी पतीची बाजू घेतली आणि तरुणीला फसविण्याची धमकी दिल्याचा आरोप केला गेला आहे. 
 
यापूर्वी 21 डिसेंबरला पीडित युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी ही तक्रार लक्षात घेत ठाणेदार चव्हाण यांची वर्ध्यात तात्पुरती बदली झाली तसेच हिंगणघाटला प्रभारी ठाणेदार नेमण्यात आले. पुन्हा तक्रार झाल्यावर चव्हाण यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे.