सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (10:11 IST)

तुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केले राज ठाकरे यांच्या कडे लिखित तक्रार

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया  यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडीकडून होणाऱ्या चौकशीवर प्रतिक्रिया देणं भयंकर महागात पडले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर अंजली दमानिया यांना जोरदार ट्रोल केले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग केल्यानंतर अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांना लिखित स्वरूपात मोठा मेसेज करुन तक्रार केली. शिवाय याबाबत आपल्याला काय वाटतं, असंही विचारलंय.
 
“नमस्कार मी सौ अंजली दमानिया, आज मी आपल्याविरुद्ध एक ट्वीट केलं की, ‘आपण ईडीच्या चौकशीला निघालाच की सत्यनारायणाच्या पूजेला’, यावर आपल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग केलं, व्हॉट्सअपवरही पाठवत आहे. आपणही आपल्या भाषणात अनेकदा काहींना अस्वल म्हणता, तर काहींची टिंगल उडवता, मग नुसतं एवढं म्हटलं तर कुठे बिघडलं? मी लोकशाहीत राहते, मला माझी मतं मांडण्याचा अधिकार आहे, माझ्यावर झालेल्या ट्रोलिंगबद्दल आपल्याला काय वाटतं ते कळवावे.. धन्यवाद,” असा मेसेज दमानिया यांनी केला.